*कोकण Express*
*लोकसभेच्या अन विधानसभेच्या सर्व जागा शिवसेना लढवणार आणि जिंकणारही*
*शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख कोल्हापूर अरुण दूधवडकर*
येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागा शिवसेना ईर्षने व संपुर्ण ताकदीन लढवणार आणि जिंकूनही दाखवणारा असे प्रतिपादन आज तालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख विभाग प्रमुख गटप्रमुख व शाखाप्रमुख यांच्या मेळाव्यामध्ये शिवसेना संपर्क व उपनेते श्री अरुण दुधवाडकर यांनी काढले…
कष्ट, संयम, जिद्द व निष्ठा या जोरावर मा शिवसेनाप्रमुखांचे विचार जोपासत ज्या शिवसेनेची उभारणी झाली त्याच समाजकारणातून व राजकारणातून प्रेरणा घेऊन जनहिताची कामे करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसून गेलेल्या गद्दारांना धडा शिकवत लोकसभेच्या व विधानसभेच्या सर्व जागा शिवसैनिकांच्या एकजुटीने शिवसेनेचा जिद्दीन व अथक प्रयत्नांना जिंकून पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनाप्रमुखचा भगवा निश्चित लावेल यासाठी शिवसेना पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांन घरोघरी जाऊन आपल्या पक्षाची ध्येय धोरणे व उध्दवजिंचे विचार जोपासणे व ते रुजवणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठ शाखाप्रमुख गटप्रमुख या सर्वांची नोंदणी करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिस्तबद्धरित्या सामोर जाऊन शिवसेनेचा विजय अधिक सुकर करून या होणाऱ्या विजयाची शिल्पकार बनुया असे आवाहन करत ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या जीवावर सत्ता भोगली ज्यांनी पद भोगली ते आज मातृवत शिवसेनेशी गद्दारी करून सोडून गेलेले आहे …परंतु अशाही वेळेला आज शिवसेनेची सर्वसामान्य शिवसैनिकांनी साथ कधीही सोडलेली नाही ..आजपर्यंत शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीमध्ये तयार झालेले नेते सोडून गेले. परंतु कार्यकर्त्यांनी शिवसेना कधीही सोडलली नाही …जनतेच्या जीवावर अधिराज्य करणाऱ्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या सर्व विधानसभा व लोकसभा निवडणुका अत्यंत तळमळीने आणि जोमाने जिंकण्यासाठी सामान्य शिवसैनिकांनी कष्टाने तयार राहावं… त्याचबरोबर पक्षप्रमुखांचे आदेशाने ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयामध्ये शिवसेनेची अत्यंत मोलाची भूमिका असली पाहिजे शेवटी पक्षशिस्त आणि पक्षश्रेष्ठ हा आदेश बाळगत शिवसेना पक्षप्रमुख सांगतील तो शिवसेनेचा अथवा सहयोगी पक्षांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी निष्ठेने व जोमानं तयारी लागावं यासाठी शाखाप्रमुच्या नोंदण्या व इतर सर्व संघटनात्मक कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारची मुलाहिजा न ठेवता अत्यंत सक्षमपणेने तयार रहाव व येणाऱ्या या दोन वर्षांमध्ये जिद्द संयम सचोटी व प्रामाणिकपणाच्या धोरणावर उद्धवजींच्यावरील निष्ठेवर आणि शिवसेनेच्या बळावरती शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करून पुन्हा एकदा शिवसेनेला शिवसैनिकांच्या जीवावर गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध होऊया असेही आवाहन या वेळेला श्री अरुण दुधवडकर यांनी केले… या वेळेला शिवसेनेचे माजी आमदार सर्वश्री सत्यजित पाटील . सुचित मिणचेकर उल्हासदादा पाटील तसेच जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे मुरलीधर जाधव सांगलीची जिल्हाप्रमुख अभिजीत पाटील शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले सुनील मोदी महिला आघाडी प्रमुख शुभांगी पवार शिवसेना शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे सर्व नगरसेवक सर्व शाखाप्रमुख तालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते