*कोकण Express*
*डॉ दुर्भाटकर यांचा मळेवाड येथे सत्कार*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मळेवाड येथील श्री गजानन महाराज सेवा मंडळाने सावंतवाडी येथील डॉ.दूर्भाटकर यांचा त्यांच्या सेवा निवृत्ती बद्द्दल ,गोवा केरी येथील उद्योजक पुरुषोत्तम वस्त यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री गजानन महाराज सेवा मंडळ मळेवाड यांनी डॉ.दुर्भाटकर यांच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची दखल घेत मंडळाने त्यांचा यथोचित सत्कार करुन सन्मान केला.यावेळी बोलताना मंडळाचे सचिव राजन नाईक यांनी डॉ.दुर्भाटकर हे गोर गरीब जनतेसाठी देवदूत असून,त्यांनी जनतेची इमाने इतबारे सेवा केली.रात्री कितीही वाजता पेशंट आला तरी न थकता त्यांनी जनतेची सेवा केली.यावेळी अध्यक्ष मधुसूदन राऊत,उत्तम नाईक,बाळा शिरसाट,रमाकांत नाईक ,प्रसाद मांजरेकर,नरेश किनलेकर आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.