तळेरेत जलशक्ती कॅच द रेन अभियान अंतर्गत विशेष मार्गदर्शन

तळेरेत जलशक्ती कॅच द रेन अभियान अंतर्गत विशेष मार्गदर्शन

*कोकण Express*

*तळेरेत जलशक्ती कॅच द रेन अभियान अंतर्गत विशेष मार्गदर्शन*

*कासार्डे ; संजय भोसले*

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व प्रज्ञांगण तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्ञांगण तळेरे येथे जलशक्ती कॅच द रेन ३.० या अभियानांतर्गत पाणी संवर्धन विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यानिमित्ताने जलसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास l गौरी सारंगे यांनी पाण्याचे महत्व सांगितले, सतीश मदभावे म्हणाले की, आज पाण्याचा अपव्यय असा होतो आणि तो कसा टाळता येईल यावर मार्गदर्शन केले. तर लोकमत चे पत्रकार तसेच संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांनी पाण्याचे संवर्धन कशा प्रकारे करता येऊ शकते यावर मार्गदर्शन केले.

उपस्थित सर्वांना जलशक्ती आणि जलसंवर्धन या विषयावर मार्गदर्शना बरोबर मुलांनी सीड्स बॉल सुद्धा बनविले. यावेळी सुमारे ६४ विद्यार्थी उपस्थित होते. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी देशभरात जलशक्ती अभियानाची सुरुवात झाली आहे. हा एक केंद्र शासनाचा प्रकल्प असून लोकांपर्यंत जनजागृती व्हावी आणि भूजल पातळी वाढावी तसेच जलप्रदूषण कमी व्हावे ह्या हेतूने कॅच द रेन हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

कार्यक्रमावेळी स्मितेश पाष्टे, राहुल कुंभार, वर्षाराणी कासलीवाल, जयदीप कोनकर आदिंचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी मोहितकुमार सैनी तसेच प्रज्ञांगण च्या संस्थापिका सौ श्रावणी मदभावे यांनी मेहनत घेतली.

या कार्यक्रमाला प्रज्ञांगणच्या संस्थापिका सौ. श्रावणी मदभावे, प्रणाली मांजरेकर, कीर्ती आंबेरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली मांजरेकर यांनी केले व आभार श्रावणी मदभावे यांनी केले.कार्यक्रमाचा शेवट विद्यार्थ्यांनी पाण्याचे संवर्धन तसेच पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी कटिबध्द असल्याची शपथ घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!