*कोकण Express*
*तळेरे येथे NEMS स्मार्ट किड्स प्री- प्रायमरी स्कूलचे दिमाखदार उद्घाटन*
*कासार्डे ; संजय भोसले*
आदर्श एज्युकेशन सोसायटी, खारेपाटण संचलित नॅशनल इंग्लिश मिडीअम स्कूल नडगिवे /खारेपाटण शी संलग्न असलेल्या तळेरे येथील NEMS स्मार्ट किड्स प्री-प्रायमरी स्कूलचे उद्घाटन प्रख्यात बालनाट्य कलाकार फेम लेखक व दिग्दर्शक प्रवीणकुमार भारदे यांच्या हस्ते फीत कापून पार पडले.यावेळी व्यासपीठावर तळेरे ग्रामपंचायतीचे सरपंच हनुमंत तळेकर, खारेपाटण येथील आदर्श एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मनोज गुळेकर, तळेरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, संस्थेचे कार्याध्यक्ष रघुवीर राणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने झाली.यावेळी नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इयत्ता सातवीतील विद्यार्थिनीनी देवी शारदा वंदना सादर केली. सदर विद्यालयाचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख तेजश्री भोकरे यांनी संस्थेची स्थापना व आता पर्यंतची वाटचाल या विषयीची माहिती दिली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रवीणकुमार भारदे यांनी बोलताना सांगितले की, तळेरेमध्ये प्ले स्कूल उभारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे आणि तो प्रयत्न मनोज मुळेकर यांनी केला याबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे कारण मुंबईसारखे शहरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण या शाळेमध्ये मिळणार आहे. तसेच अत्याधुनिक पद्धतीने हे NEMS स्मार्ट किड्स प्री- प्रायमरी स्कूल सुरू झाले आहे त्यामुळे तळेरे व आजूबाजूच्या गावातील मुलांनी याच शाळेत शिक्षण घेतले तर त्यांचे भवितव्य उज्वल होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी बोलताना सांगितले की मी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मीही एक विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांनी सहकार्य करण्याचे काम करत आहे. विद्यार्थी हा यंत्र न बनता उत्तम नागरिकत्व असलेला माणूस घडावा हीच माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मुलांचे पालकत्व मी स्वीकारत आहे. भविष्यात या मुलांना चांगले शिक्षण तर देणारच पण चांगला माणूस घडवण्यासाठी देखील मी प्रयत्न करणार असल्याचे तसेच खारेपाटण नडगीवे व तळेरे येथील दशक्रोशीत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बहुआयामी आणि विविधांगीण शिक्षणाची उपलब्धता करणार असल्याचे गुळेकर यांनी सांगितले. यासाठी पालकांनी सहयोग द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
उपस्थित विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. सदर उद्घाटन सोहळ्यास माजी सरपंच शशांक तळेकर,संचालक मोहन कावळे. कायदेतज्ञ सागर तळेकर,राजेंद्र ब्रह्मदंडे, परवेझ पटेल, संस्था समन्वयक पराग शंकरदास, तेजस जमदाडे, गजानन कदम, प्रणित शेट्ये, श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशनचे सतीश मदभावे, तंबाखू प्रतिबंधक अभियानच्या प्रमुख श्रावणी मदभावे ङयांच्यासह बहुसंख्येने पालक शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महवीश मुल्ला आणि आभार प्रकटन जोया पटेल या विद्यार्थिनींनी केले. संगीत साथ हेमंत तेली यांनी दिली.