*कोकण Express*
*हरकुळ खुर्द येथे शिवसेलेला खिंडार,अनेक
शिवसैनिक भाजपात*
*आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हरकुळ खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेला भगदाड पडले आहे.येथील अनेक शिवसैनिकांनी भाजपात पक्ष प्रवेश केला.आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे
राजन उर्फ बाबू रासम यांनी सांगितले.यावेळी स्थानिक पातळीवरील अनेक पदाधिकारी या प्रवेशात सहभागी झाले होते.या पक्ष प्रवेश म्हणजे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना धक्का असल्याचे मानले जात आहे.
या पक्ष प्रवेशात राजन उर्फ बाबू रासम,दाजी रासम,शशांक रासम ,नागेश दळवी,तानाजी रासम,,चंद्रकांत मडव, संजय मडव, राकेश रासम,बाळकृष्ण कुबल,उदय मासये,विलास तेली, सुनील हुले, सिद्धेश परब,अजय घडी,पांडुरंग रासम,रोशन वाळवे,प्रदीप रासम,सुमित परब, संदेश राणे,यांनी भाजपा त प्रवेश केला.
यावेळी तुषार रासम,भाजपा युवा मोर्चा जिल्हा कार्यकरिणी सदस्य सर्वेश दळवी,शामसुंदर रासम,दीपक हुले,शशिकांत मडव,आदि उपस्थित होते.