कणकवलीत युपीएससी , एमपीएससी ५० विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करणार –संदेश सावंत

कणकवलीत युपीएससी , एमपीएससी ५० विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करणार –संदेश सावंत

*कोकण Express*

*कणकवलीत युपीएससी , एमपीएससी ५० विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करणार –संदेश सावंत…*

*आशिये,सातरल,कासरल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जिजाऊ फाऊंडेशन , युवा प्रतिष्ठान तर्फे मोफत वह्या वाटप; विद्यार्थ्यांनी चिकाटी बाळगुन मेहनत करण्याची गरज*

*कणकवली ः प्रतिनिधी*

जिजाऊ फाऊंडेशन आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिंधुदुर्गात २ लाख वह्या वाटप प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना केले जात आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन हा उपक्रम राबवला जातो. याठिकाणी पोलीस भरती प्रशिक्षण वर्ग सुरु केले. मात्र काही दिवसांतच येथील विद्यार्थ्यांनी व पालकांनी पोलीस भरती पुढे गेल्याने प्रशिक्षण थांबवले . त्या उलट पालघर , ठाण्यामध्ये जिजाऊ च्या प्रशिक्षण वर्गातील २४७ विद्यार्थी पोलीस बनलेत. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनी चिकाटी बाळगण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षक , पालक आणि सर्वंच राजकारण्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. येत्या २ महिन्यांत कणकवलीत युपीएससी , एमपीएससी ५० विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी केले.

आशिये,सातरल,कासरल, पिसेकामते येथील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना जिजाऊ शैक्षणिक,सामाजिक संस्था पालघर व युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत वह्यावाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आशिये सरपंच महेश गुरव , माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, उपसरपंच संदीप जाधव,माजी सरपंच शंकर गुरव, सदानंद बाणे , पत्रकार भगवान लोके, संजय बाणे , पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे , शिवा गुरव , संतोष जाधव , पिसेकामते सरपंच श्रीमती मुद्राळे, सातरल सरपंच श्रीमती परब , सातरल उपसरपंच संकेत राणे , माजी सरपंच प्रदिप राणे , कासरल माजी सरपंच दिलीप तिर्लोटकर, प्रसाद सावंत, सुशील राणे, पंढरी परब , बंड्या सावंत आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी संदेश सावंत म्हणाले,

युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि ते जिजाई फाऊंडेशन मार्फत एकत्र काम करण्यामागचा एकच सामाजिक बांधिलकी हा हेतू आहे.मुलांना वह्या वाटप हा खारीचा वाटा आहे. आशिये शाळेला चांगली इमारत दिली जाईल. युवा प्रतिष्ठानची टॅलेंट सर्च स्पर्धा शिक्षकांमुळे नावारुपास आली. विकास कामे 90 टक्के पुर्ण झाली आहेत . नवीन विकास कामे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होतील मात्र कोकणातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आशिये गावचे सरपंच महेश गुरव याची गावाबद्दल कायम तळमळ असते. त्यांना भविष्यात चांगला पदाधिकारी बनण्यासाठी आमचे प्रयत्न असतील .

आशिये सरपंच महेश गुरव म्हणाले, युवा संदेश

प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम

गोट्या सावंत करत आहेत.मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन, शिष्यवृत्ती सराव परीक्षा ,सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा , गुणवंत विद्यार्थी सत्कार,व्यायामशाळा,वाचनालय, कराटे प्रशिक्षण, रक्तदान शिबीर, मोफत रुग्णवाहिका, आरोग्य शिबीर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मॅरेथॉन स्पर्धा,पोलीस भरती प्रशिक्षण, वारकरी संप्रदाय मेळावा,शेतकऱ्यांना खत वाटप,भजन स्पर्धा,दशावतार महोत्सव, लक्षवेधी आंबे खाण्याची स्पर्धा हे उपक्रम राबवत आहेत.तळागाळातील जनतेसाठी गोट्या सावंत चांगले काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!