*कोकण Express*
*सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी सागर खंडागळे…..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी सागर खंडागळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. आज त्यांनी आपला पदभार स्वीकारला. ते यापूर्वी कणकवली पोलिस ठाण्यात कार्यरत होते. या ठिकाणी कार्यरत असलेल्या तौसिफ सय्यद यांना निवती पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर खंडागळे यांना संधी देण्यात आली आहे.