*कोकण Express*
*पळसंब गांवात बी एस एन एल (BSNL) च्या दूरसंचार सेवेचा बोजावरा ; माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर व विद्यमान उपसरपंच अविराज परब यांनी आक्रमक मागणी करत दिला उपोषणाचा इशारा*
*आचरा प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवातील बी.एस. एन.एल.ची सेवा सध्या कायमच नादुरुस्त अवस्थेत असते. माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर व विद्यमान उपसरपंच अविराज अविराज परब यांनी ‘जुनी झालेली यंत्रणा बदलून नविन आधुनिक यंत्रणा बसवून टॉवर पूर्ववत करावा’ अशी आक्रमक मागणी केली आहे.
तसेच ‘आता पावसाळा सुरू झाल्यानंतर यांचा त्रास अधिक जाणवत आहे पळसंब गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालय, रास्त भावाचे धान्य दुकान, ग्रामपंचायत असो किंवा सर्व सामान्य नागरिक सर्वजण या बी एस एन एल च्या गलथान कारभारामुळे त्रस्त आहेत’, असा आरोप करत पुढच्या ८ दिवसांत बी एस एन एल ने योग्य सेवा न दिल्यास विद्यमान उपसरपंच अविराज परब आणि माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी मालवण कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे