गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गतर्फे तसेच मैत्री ग्रामसंघ, आजगांव ग्रामपंचायत व साईबाबा न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने साई मंदिर, आजगांव परिसरात वृक्षारोपण

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गतर्फे तसेच मैत्री ग्रामसंघ, आजगांव ग्रामपंचायत व साईबाबा न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने साई मंदिर, आजगांव परिसरात वृक्षारोपण

*कोकण Express*

*गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गतर्फे तसेच मैत्री ग्रामसंघ, आजगांव ग्रामपंचायत व साईबाबा न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने साई मंदिर, आजगांव परिसरात वृक्षारोपण*

*वेंगुर्ले ःःप्रतिनिधी* 

पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गतर्फे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आजगांव येथील साई मंदिर परिसरात सुपारीच्या रोपांचे आज वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच यावेळी मैत्री ग्रामसंघ, आजगांव ग्रामपंचायत व साईबाबा न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आजगांव सरपंच सौ. यशश्री सौदागर व मैत्री ग्रामसंघ अध्यक्षा सौ. प्रिया आजगांवकर तसेच साईबाबा प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी यांच्याहस्ते सुपारीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
🔸यावेळी साईबाबा प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रपती पुरस्कार विजेते माजी शिक्षक श्री. विलासानंद मठकर यांच्या हस्ते पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्रचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रसाद मडगांवकर यांचा आजगांव सरपंच सौ. यशश्री सौदागर यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच साईबाबा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व पत्रकार संरक्षण समिती, सिंधुदुर्ग कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रसाद मडगांवकर, जिल्हा संघटक श्री. जाफर शेख, जिल्हा उपखजिनदार श्री. मदन मुरकर, जिल्हा सदस्या श्रीमती सिमंतिनी मयेकर, आजगांव सरपंच तसेच साईबाबा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. यशश्री सौदागर, उपसरपंच सुशील कामटेकर, मैत्री ग्राम संघ अध्यक्षा सौ. प्रिया आजगांवकर, सीआरपी सौ. छाया हरमलकर, सौ. उमा आजगावकर, साईबाबा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. अवी शिरोडकर, सचिव व राष्ट्रपती पुरस्कार विजेते माजी शिक्षक विलासानंद मठकर सर, खजिनदार आनंद सौदागर, विश्वस्त श्री. दिवाकर पांढरे, सुरेश तेली, भालचंद्र गोडकर, शरद पांढरे, प्रमोद पांढरे, गजानन पांढरे, सुनील वाडकर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश मयेकर, प्रियांका देसाई, पुजारी श्री. राजीव योगी, यांच्यासह विविध बचतगटांचे अध्यक्ष व सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
आजच्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आजगांव येथील साईबाबा मंदिरात आज महापूजा, महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद यासह गायनाचे कार्यक्रम व अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!