*कोकण Express*
*जिल्हा परिषद शाळा नांदगाव असलदे क्रमांक 4 नजीक होत असलेल्या एअरटेल मोबाईल टॉवरचे बांधकाम थांबावे*
*अझरुद्दीन गवस कुंणकेरकर त्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन*
*कणकवली प्रतिनिधी*
जिल्हा परिषद शाळा नांदगाव असलदे क्रमांक 4 नजीक होत असलेल्या मोबाइल टॉवरचे बांधकाम थांबवण्यात यावे. असे निवेदन अझरुद्दीन गवस कुंणकेरकर राहणार नांदगाव यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
जिल्हा परिषद शाळा असलदे क्रमांक चार तालुका कणकवली या शाळेच्या इमारतीला लागून गट नंबर 157/ 2 ही जमीन गुरुदत्त वायंगणकर यांच्या मालकीची असून सदर जागेत एअरटेल मोबाईल टॉवर उभरण्याचे काम सुरू आहे. हा एअरटेल टॉवर च्या बाजूला पहिली ते चौथी शाळा व अंगणवाडी असल्याने टॉवरच्या रेडिएशनमुळे शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात येणार येणार असल्याने गावातील ग्रामस्थ व पालक यांचे तक्रारी अर्ज ग्रामपंचायतीकडे येत आहेत. सदर एअरटेल टॉवरच्या बांधकामावर योग्य ती कारवाई करावी असे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले.