*कोकण Express*
*लिटिल चॅम प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांची वेळगिवेतील रामेश्वर मंदिराला भेट..*
*निसर्ग संपन्न परिसरात लुटला गायनाचा आनंद…*
*कासार्डे ; संजय भोसले*
सुप्रसिद्ध लिटिल चॅम म्हणून प्रसिद्ध असलेले गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैस्पायन यांनी सोमवारी देवगड तालुक्यातील’ पुण्यक्षेत्र वेळगीवे गावठाण येथील श्री रामेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.
याप्रसंगी वळगीवे गावचे सरपंच श्री राजन लाड आणि उपसरपंच सहदेव लाड यांनी दोन्ही सेलिब्रिटींचा छोटासा सत्कार केला.
झी मराठी वरील लिटिल चॅम्प या संगीतमय कार्यक्रमातून घर घरात पोचलेली मुग्धा वैश्यपयांन आणि प्रथमेश लगटे हे दोघे आपल्या संगीतमय आवाजाच्या दुनियेतून प्रसिद्ध झाले, आपल्या जादुई आवाजाने सर्वानाच त्यांनी मंत्रमुग्ध करून टाकले आहे .मुग्धा वैशंपायन यांनी तर भारतीय शास्त्रीय संगीतत् एम ए पदवी प्राप्त केली .
आज अचानक त्यांनी कोकणातील देवगड तालुक्यातील वेळगीवे गावातील पांडव कालीन असलेले पुण्यक्षेत्र श्री रामेश्वर मंदिराला भेट दिली . मंदिरात येऊन त्यांना तिथे खूपच छान वाटले आणि दोघांनी मिळून मंदिराच्या आवारात आज परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी!
त्यानिमत्ताने त्यांनीच रचलेल्या ‘करुणात्रिपदीचा “शांत हो श्री गुरुदत्ता” हे गाणे आपल्या सुमधुर आवाजात गाऊन स्वामी चरणी अर्पण केले.