*कोकण Express*
*गोकुळ चे अध्यक्ष अरूण डोंगळे यांची जिल्हा बँक प्रधान कार्यलयास भेट*
*दुग्ध विकास आढावा समिती सभेस उपस्थिती*
*मनिष दळवी यांनी केले स्वागत*
*सिंधुनगरी (प्रतिनिधी)*
सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिल्ह्यात दुध उत्पादन वाढीसाठी चांगला प्रयत्न करत असुन त्यांच्या या प्रयत्नांना गोकुळ नेहमीच सहकार्य करेल अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) चे अध्यक्ष अरूणराव डोंगळे यांनी जिल्हा बँक, गोकुळ, भगीरथ प्रतिष्ठान आयोजित दुग्ध विकास आढावा समिती सभे मध्ये दिली.* जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी यांची दुग्ध विकास आढावा समिती सभा सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेस कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) चे अध्यक्ष अरूणराव डोंगळे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस, समिर सावंत,नाबार्ड जिल्हा प्रबंधक अजय थुटे ,दुग्ध विकास अधिकारी कृष्णा धुळप,जि.प.पशुसंवर्धन विभाग अधिकारी विद्यानंद देसाई,गोकुळ चे अधिकारी योगेश गोडबोले,नितीन रेडकर, जिल्हा बँक मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,भगिरथ प्रतिष्ठान झारापचे डॉ.प्रसाद देवधर,प्रभाकर सावंत, मनोज रावराणे,जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ)चे अध्यक्ष अरूणराव डोंगळे यांनी गोकुळचे अध्यक्ष झाल्यावर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास भेट दिली.त्यांचे स्वागत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले.गोकुळ चे अध्यक्ष अरूण डोंगळे व उपॊ्थ्तीत दुध उत्पादक शेतक-यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.अरूण डोंगळे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्ह्यात दुध उत्पादन वाढीसाठी चांगला प्रयत्न करत असुन त्यांच्या या प्रयत्नांना गोकुळ नेहमीच सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.