यशाची परंपरा राखत, पुन्हा खारेपाटण महाविद्यालयाची भरारी

यशाची परंपरा राखत, पुन्हा खारेपाटण महाविद्यालयाची भरारी

*कोकण Express*

*यशाची परंपरा राखत, पुन्हा खारेपाटण महाविद्यालयाची भरारी*

जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ८७.९१%.
मुंबई विद्यापीठाकडून नुकताच जाहीर झालेल्या निकालात महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मुंबई विद्याीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये या महाविद्यालयातून वाणिज्य शाखेद्वारे फायनान्शिअल अकाउंटिंग अँड ऑडिटिंग व व्यवसायिक व्यवस्थापन विषयात एकूण ९१ विद्यार्थ्यांपैकी ८० विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली असून, कु. शाहिस्ता खान हिने ६७.९२% मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर कु. नवेद मुकादम व कु. सौरभ पेंडकलकर यांनी ६७.३३%, ६४.३६ % क्रमशः द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रवीण लोकरे व सर्व संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांच्या कडून मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!