*कोकण Express*
*आळंदी लाटी हल्ला प्रकरणी शिवसेनेने केला सरकारचा निषेध मोर्चा; संदेश पारकर*
*सिंधुदुर्ग :*
आळंदी येथे वारकऱ्यांवर सरकारकडून लाटी हल्ला करण्यात आला .त्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे.म्हणून आज वैभववाडी शहरातून निषेध मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले होते.
यावेळी सरकारचा निषेध करताना पारकर म्हणाले की, वैभववाडी आणि शिवसेना तसेच महाविकास आघाडी यांनी सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा काढलेला आहे. जो आळंदीच्या वारकऱ्यांवरती लाटी हल्ला झाला त्याचा निषेध करण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे या वारकरी संप्रदायावर सुद्धा सरकारने निष्ठुरपणे निर्दयीपणे लाटी चालवण्याचं काम या सरकारने केला आहे .म्हणून शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त केला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशाच प्रकारे मोर्चा होत आहेत. या सरकारमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणं मुश्किल झाल आहे. शिंदे फडणवीस या सरकारमुळे जनता ही मेटाकुटीला आलेली आहे.
आळंदी मध्ये झालेला लाठीचार्ज हा संपूर्ण सोशल मीडियावर प्रसारमाध्यमांमध्ये दिसून आलेला आहे. या सरकारने वारकऱ्यांना कसं मारलं हे संपूर्ण घडलेला प्रकार हा महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये कोणीही सुरक्षित नाही ,जो जो व्यक्ती सरकारकडे न्याय मागायला जाईल त्याला त्रास देणं या सरकारचं काम सुरू आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीच्या विरोधात जनतेच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी निर्णय होणार आहे. आपल्याकडे 2024 पर्यंत सत्ता आहे कधी ना कधी आपल्याला जनतेच्या दरबारामध्ये कौल घेण्यासाठी जावं लागणार आहे म्हणून आज महाराष्ट्र शासनामध्ये निवडणुका घेण्याची हिम्मत नाही. जर आज निवडणुका झाल्या तर सत्ता असताना आपल्या हातातून जातील अशी भीती सरकारला वाटत आहे. त्यामुळे निवडणुका सुद्धा त्यांनी पुढे लांबविलेल्या आहेत. जितका सत्तेचा गैरवापर करता येईल तेवढा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. यावेळी या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले होते यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.