कणकवली पंचायत समिती समोर शिक्षक भरतीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आंदोलन

कणकवली पंचायत समिती समोर शिक्षक भरतीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आंदोलन

*कोकण Express*

*कणकवली पंचायत समिती समोर शिक्षक भरतीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आंदोलन*

*जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट असल्याचा आरोप*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शून्य शिक्षकी शाळांमुळे विद्याध्यचि होणाऱ्या नुकसाना बद्दल शासनाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली पंचायत समिती समोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या शिक्षण मंत्र्याचे “करायचं काय” “खाली डोक वर पाय’ अशा घोषणा देत शासनाचा शिवसेना ठाकरे गटाने निषेध केला. तर पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावरच शिवसेना गटाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी ठिय्या मांडला. गेल्या अनेक वर्षानंतर कणकवली पंचायत समिती समोर अशा प्रकारे मोठे आंदोलन झाले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले सचिन सावंत माजी नगरसेवक कन्हया पारकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवा सेना तालुका प्रमुख उत्तम लोके, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, प्रसाद अंधारी, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री, तात्या निकम, वैभव मालनडकर, सिद्धेश राणे, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, निसार शेख, माजि जि प सदस्य स्वरूपा विखाळे, प्रदीप सावंत, जयेश धुमाळे, तेजस राणे, ललित घाडीगावकर, रुपेश नार्वेकर, रुपेश आबडोसकर, सिकंदर मेस्त्री, सोहम वाळके, विलास गुडेकर आधी उपस्थित होते. या वेळी जोरदार घोषणा देत शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. तसेच गटविकास अधिकारी येईपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका देखील ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात आली. अखेर गटविकास अधिकारी अरुण चव्हाण हे आंदोलन कर्त्यांना सामोरे गेल्यानंतर एकही शाळा बिना शिक्षकी राहता नये, शिक्षण स्वयंसेवक यांची नियुक्ती करा. अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला. यावेळी पालकांनी देखील आम्हाला महागड्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करता येणार नाही, आम्ही मोल मजुरी करतो अशा भावना व्यक्त केल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!