*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांच्या एका फोनवर टोल वसुली बंद*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांनी एक फोन करताच टोल वसुली बंद झाली. जोपर्यंत शंभर टक्के नुकसान भरपाई जमीन मालकाला मिळत नाही तसेच टोलच्या आजूबाजूला शौचालय बांधणे हेही काम अपूर्ण आहे. जनतेच्या मागण्या आणि महामार्गाची अर्धवट राहिलेले कामे पूर्ण होत नाहीत आणि एम. एच. ०७ च्या गाड्यांना टोल माफी च्या मागण्या संदर्भात जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत टोल सुरू करू नका. अशा सूचना दिल्या नंतर टोल वसुली करणारी कंपनी ओरल असोसिएट यांनी टोल वसुली बंद केली.