*कोकण Express*
*ओसरगाव येथे पोलीस बंदोबस्तात सकाळी ८ वाजल्यापासून सुरु असलेली टोल वसुली १.५५ मिनिटांनी थाबवली ; तांत्रिक अडचणीचे कारण…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथे अखेर कोरल असोसिएट राजस्थान या कंपनीकडून सकाळी ८ वाजल्यापासून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आली होती. सिंधुदुर्गवासीयांचा विरोध जुगारून ही टोल वसुली पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आली आहे. मात्र, कंपनीच्या सूचनेनुसार १.५५ मिनिटांनी टोल वसुली थाबवली. टोल वसुली करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळेच ही टोल वसुली बंद करण्यात येत असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक रोहन डांगे यांनी दिली. काही दिवसानंतर ही टोल वसुली पुन्हा सुरु करण्यात येईल. सिंधुदुर्ग पासिंग वाहनाबाबत कोणतीही सूचना आलेली नाही. हा निर्णय झाल्यानंतर आपल्याला कळविण्यात येईल. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.