*कोकण Express*
*ओसरगाव येथे पोलीस बंदोबस्तात टोल वसुलीला सुरुवात*
*टोलमुक्त कृती समिती टोल वसुली रोखणार; पोलीस अधिकाऱ्यांसह शेकडो पोलीसांचा बंदोबस्त*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथे अखेर कोरल असोसिएट राजस्थान या कंपनीकडून सकाळी आठ वाजल्यापासून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे. सिंधुदुर्गवासीयांचा विरोध जुगारून ही टोल वसुली पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आली आहे. काही वेळात सिंधुदुर्ग वासियांसह टोल मुक्त कृती समिती टोल नाक्यावर धडक देणार असल्याने संघर्ष अटळ आहे.
सिंधुदुर्ग वासियांना टोलमुक्ती मिळाल्याशिवाय टोल वसुली करू नये, अशी भूमिका जिल्ह्यातील लोकाची आहे. सर्वपक्षीय एकवटून एकत्र येऊन या टोलला विरोध शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.