*कोकण Express*
*नेरुर मध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त श्री देव कलेश्वर मंदिरात अभिषेक, पूजन व गार्हाणे..!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या नेरूर गावातील व विभागातील युवासेना तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने यानिमित्ताने नेरूर गावचे ग्रामदैवत श्री देव कलेश्वर मंदिर येथे अभिषेक व पूजन करण्यात आले.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना निरंतर उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य तसेच सामाजिक व राजकिय क्षेत्रा उत्तुंग यशकिर्ती लाभावी म्हणून ‘श्रीं’च्या चरणी गा-हाणे सुद्धा देण्यात आले.
यावेळी नेरुर गावच्या सरपंच सौ. भक्ती घाडीगांवकर, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, ग्रा.प. सदस्य प्रविण नेरूरकर, ग्रा.प. सदस्य मंजूनाथ फडके, ग्रा.प. सदस्य रोशनी नाईक, ग्रा.प. सदस्य संतोष कुडाळकर, मा.ग्रा.प. सदस्य प्रसाद गावडे, विजय लाड, ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ गावडे काका, युवासेना कुडाळ उप तालुका प्रमुख विनय गावडे, शिवसैनिक, युवासैनिक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.