*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोल माफी न देता टोल सुरू केल्यास तीव्र विरोध : भाजप तालुका अध्यक्ष मेस्त्री*
*महामार्ग प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल, दिला इशारा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम.एच.०० पासिंगच्या वाहनांना टोल माफी मिळत नाही तोपर्यंत ओसरगाव येथील टोल सुरू करण्यास आमचा विरोध राहणार आहे. प्रशासनाने आमची मागणी मान्य न करता टोल सुरू केल्यास होणाऱ्या परिणामास आम्ही जबाबदार राहणार नाही. पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल असा इशारा भाजप तालुका अध्यक्ष कणकवली तथा पंचायत समिती माजी उपसभापती मिलिंद मैस्त्री यांनी निवेदनातून दिला आहे.
भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई – गोवा मार्गावरील कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथे झालेला टोल नाका उद्या दिनांक १४ जून २०२३ रोजी सुरू होणार आहे, असे प्रसार माध्यमाद्वारे समजते. परंतु राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई-गोवा हायवेचे काम अजूनही प्रलंबित आहे. जनतेचे प्रश्न सुटल्याशिवाय टोल नाका सुरू होऊ देणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा वासीयाची असलेली एम. एच. ०७ टोल माफीची मागणी तसेच भूसंपादनाचे पैसे व टोल नाक्यावरील असणारे सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृह पूर्ण होत नाही. तोपर्यंत कोणताच टोल सुरू करू देणार नाही. विशेतः एम. एच. ०७ च्या गाड्यांना माफी मिळत नाही तो पर्यंत टोल सुरू झाल्यास होणाऱ्या परिणामाला प्रशासन जाबाबदार राहील. असा इशारा भाजप तालुका अध्यक्ष तथा माजी उप सभापती मिलिंद मिस्त्री यांनी दिला आहे.