*कोकण Express*
*नवीन कुर्ली वसाहतला स्वतंत्र ग्रामपंचायतीची मंजुरी द्या…*
*आमदार नितेश राणे यांची ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी..*
कणकवली तालुक्यातील पुनर्वसीत नवीन कुर्ली वसाहतसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. तथा पद्धतीचे मागणीचे पत्र आमदार नितेश राणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे यापूर्वीही अनेकवेळा या. ग्रामपंचायतीसाठी आमदार राणे यांनी पाठपुरावा केलेला आहे. प्रस्ताव सुद्धा दिलेले होते.