*कोकण Express*
*वाहतूक पोलीस बस्ताव मोतेश पिंटो यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग पोलीस विभागात जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत असलेले वाहतूक पोलीस बस्ताव मोतेश पिंटो (वय ५०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी दुपारी दुःखद निधन झाले आहे. जिल्हा वाहतूक शाखा सिंधुदुर्ग येथे सेवा बजावत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे सेवा बजावत असताना शुक्रवारी अचानक छातीत दुखू लागले व श्वास कोंडू लागला सहकारी पोलिसांनी त्यांना उपचारासाठी कणकवली येथे खासगी दवाखान्यात दाखल केले मात्र तत्पूर्वीच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. काल झालेल्या ट्रॅक्टर रॅली मध्ये बंदोबस्तात सहभागी झाले होते हसत खेळत असताना त्यांच्या दुर्दैवी अंत झाला आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे त्यांच्या दुःखत निधनामुळे सिंधुदुर्ग पोलिस विभागावर शोककळा पसरली आहे पिंटू यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी समजताच कणकवली येथील खासगी रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती गेली अनेक वर्षे पोलिस सेवेत असताना मोठा लोक परिचय त्यांचा निर्माण झाला होता त्यामुळे त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.