सिंधुदुर्ग जिल्हा पासिंगच्या एकही वाहनाने टोल सुरु केल्यास टोल भरु नये

सिंधुदुर्ग जिल्हा पासिंगच्या एकही वाहनाने टोल सुरु केल्यास टोल भरु नये

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हा पासिंगच्या एकही वाहनाने टोल सुरु केल्यास टोल भरु नये*

*उद्या शिवसैनिक आणि जिह्यातील जनतेला सोबत घेवुन टोल घेण्यास शिवसेना स्टाईलने विरोध करणार ; संदेश पारकर यांचा ईशारा*

*शिवसेना युवानेते संदेश पारकर यांचे उद्या टोल विरोधी आंदोलन*

*”टोलच्या नावाखाली होऊ घातलेली जिल्हावाशीयांची लूट थांबवावी.”*

संदेश पारकर यांनी सांगितले आहे की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल मुक्ती मिळण्यासाठी शिवसेना आणि जिल्ह्यातील जनता उद्या आक्रमक झालेली पाहायला मिळेल. ओसरगाव टोल नाक्यावर जिल्ह्यातील एम एच झिरो सेवन (MH 07) गाड्यांना टोलमुक्ती मिळण्यासाठी शिवसेना उद्या टोल देण्यास विरोध करणार आहे.
खरं तर गेले अनेक महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल मुक्ती मिळावी त्यासाठी उद्याचे शिवसेनेचे आंदोलन आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आम्ही ही लढाई लढत आहोत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा बसवलेला जो टोल आहे तो जिल्ह्यासाठी जाचक आहे. जवळजवळ या टोलमुळे जिल्ह्याचे विभाजन होत आहे चार तालुक्यांना मोठा फटका बसत आहे . जिल्ह्याचे मुख्य कार्यालय ही ओरोस या ठिकाणी असल्यामुळे देवगड वैभववाडी कणकवली मालवण या भागातील नागरिकांना या मार्गावरून येजा करावी लागणार आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना शेकडो रुपयांचा भुर्दंड बसणार आहे आणि हा टोल जाचक आहे .म्हणून या जिल्ह्यातून टोलमुक्ती मिळावी म्हणुन उद्याचा शिवसेनेचा आणि जिल्ह्यातील जनतेचा हा लढा असणार आहे.
खरंतर एम एच झिरो सेवनच्या गाड्यांना जायला आणि यायला वेगळा रस्ता द्यावा अशी देखील आमची शिवसेनेची मागणी असणार आहे. अजूनही मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नसून त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी पाच-पाच वर्षे जमिनी देऊन मोबदला अद्याप मिळाला नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातील एम एच झिरो सेवनच्या गाड्यांना टोल मुक्ती मिळाली नसल्याने शिवसेनेचा उद्याचा आक्रमक लढा असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवसेना, महिला, युवासेना, शिवसेना सेल पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांनी आणि सर्व सामान्य जनतेला उद्या बुधवार दि.14 जुन 2023 सकाळी 10 वाजता टोल देण्यास विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने ओसरगाव टोलनाका येथे जमावे,” असे आवाहन शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!