*कोकण Express*
*नवीन कुर्ली स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या प्रलंबित प्रस्तावाला लवकरच मंत्रालयस्तरावरून मंजुरीचा हिरवा कंदील मिळणार*
*नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आ. नितेश राणे यांच्याकडून ठोस आश्वासन*s
नवीन कुर्ली पुनर्वसन गावठाणात स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी गेली अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्थांनी केली होती या साठी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने २६ जानेवारी २०२१ रोजी सलग दहा दिवस साखळी उपोषण केले होते त्यावेळी लवकरात लवकर नवीन कुर्ली साठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करू असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले होते . या मागणीचा नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने वारंवार मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा केला होता.
आज नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, सचिव धीरज हुंबे, सदस्य अमित दळवी आणि इतर ग्रामस्थ यांनी माजी सभापती मनोज रावराणे यांच्या समवेत आ. नितेश राणे यांची मुंबई येथे भेट घेऊन रखडलेल्या नवीन कुर्ली ग्रामपंचायत च्या प्रस्तावावर ग्रामविकास मंत्रालयातून मंजुरी घेउन द्यावी अशी जोरदार मागणी केली.. त्यावेळी आ. नितेश राणे साहेब यांनी आपण तातडीने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून येत्या १५ दिवसात नवीन कुर्ली स्वतंत्र ग्रामपंचायतीची मंजुरी घेऊन देतो असे ठोस आश्वासन दिले.
गेली २५ वर्षे ग्रामपंचायत नसल्यामुळे गावात रखडलेली विकास कामे लवकरच या युती शासनाच्या माध्यमातून पूर्ण करू असेही आ.नितेश राणे यांनी सांगितले. याबद्दल नवीन कुर्ली ग्रामस्थांमध्ये व प्रकल्पग्रस्तांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.