*कोकण Express*
*साकेडी येथे दारू अड्डा उध्वस्त ! २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील साकेडी बोरुचीवाडी येथील पडक्या मांगरात रविवारी दुपारी सव्वा बारा वाजता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक आर. बी. शेळके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. तसेच गावठी हातभट्टीच्या दारूचा अड्डा उध्वस्त केला आहे. यावेळी गावठी दारूसह २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.. याप्रकरणी साकेडी बोरुचीवाडी येथील बितोज जुवा म्हापसेकर (७०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत तक्रार
पोलिस नाईक आशिष जमादार यांनी दिली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कोयंडे, हवालदार कृष्णा केसरकर है
सहभागी झाले होते.
अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.