*कोकण Express*
*फोंडाघाट ग्रा.पं.चे वायरमन रवींद्र जोईल यांचे आकस्मिक, दुःखद निधन !*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडा ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष- परोपकारी कर्मचारी तथा वायरमन रवींद्र बाळकृष्ण जोईल गांगोवाडी ( ५५ वर्षे ) यांचे मुंबई येथे गुरुवारी औषधोपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्या आजारावर औषधोपचार सुरू होते. हसतमुख, कामतप्पर आणि सर्वांना घेऊन काम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते आठवणीत राहणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि पंचक्रोशीत तीव्र दुःख व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी- मुलगा- मुलगी- बहिणी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव मुंबईहून फोंडाघाट- गांगोवाडी येथे आणण्यात आल्यानंतर, अंत्ययात्रेमध्ये ग्रामपंचायत सदस्य- सहकाऱ्यांसह, पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहून, श्रद्धांजली वाहिली…