*कोकण Express*
*कणकवली मतदार संघातील विकास कामांना निधी देऊ…*
*हसन मुश्रीफ; शिवसेना नेते सतीश सावंतांनी घेतली मुंबईत भेट…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
येथील कणकवली विधानसभा मतदारसंघातील रस्ते पायवाटा आदीचे प्रश्न गेली अनेक वर्ष तसेच आहेत.गावात दौरा करताना हे प्रश्न गांभीर्याने पुढे येत आहे. त्यामुळे या विकास कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. यावेळी वस्तुस्थिती लक्षात घेऊन लवकरात लवकर या विकासकामांना निधी दिला जाईल, असे आश्वासन श्री मुश्रीफ यांनी सावंत यांना दिले.