*कोकण Express*
*अवकाळी पावसामुळे शेतकर्यांची मोठी हानी*
*ठाकरे सरकारने शेतकर्यांना एक रूपयाचीही मदत नाही केली*
*भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांचा आरोप*
सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे शेतकर्यांची मोठी हानी झाली. पण राज्यातील ठाकरे सरकारने शेतकर्यांना एक रूपयाचीही मदत केलेली नाही असाही आरोप श्री.बोंडे यांनी केला. दरम्यान जुन्या कायद्यामुळे शेतकर्यांचे भले होणार नाही, म्हणून मोदीजींनी पुढाकार घेऊन शेतकर्यांच्या भल्यासाठी नवीन कायदे आणले. शेतकर्यांना देशभरात कुठेही माल विकता यावा यासाठी नवीन कायदे आणले. शेतकरी देशात कुठेही शेतमाल विकू शकतो. त्यातून शेतकरी समृद्ध होऊ शकतो. तसंच कृषि विधेयक लागू झाल्यानंतर देशातील एकही कृषि उत्पन्न बाजार समिती बंद होणार नाही. एकाही शेतकर्याची जमीन गहाण राहणार नाही. ती कंपन्यांना विकता येणार नाही अशीही तरतूद असल्याचे श्री.बोंडे म्हणाले.