*कोकण Express*
*कर्मचाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी संघटना नको–संदेश उर्फ गोट्या सावंत*
*कुडाळ/प्रतिनिधी*
सेवा शक्ती संघर्ष कामगार संघ महाराष्ट्र राज्य या एसटी कर्मचारी संघटनेचा जिल्हा कार्यकारिणीची मासिक सभा जिल्हाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर वेंगुर्ला आगार अध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ येथे पार पडली यावेळी विभागीय सचिव रोशन तेंडुलकर,विभागीय कार्याध्यक्ष संतोष भाट,कणकवली आगार उपाध्यक्ष मनोज कुमार पवार, विभागीय सल्लागार रोहन शिंदे,विभागीय खजिनदार प्रशांत गावडे,विभागीय सहसचिव महादेव भगत,बँक संचालक उमेदवार भरत चव्हाण,विभागीय उपाध्यक्ष संजय सावंत,विभागीय उपाध्यक्ष प्रशांत माडकर,वेंगुर्ला आगार सचिव दाजी तळवणेकर,वेंगुर्ला आगार उपाध्यक्ष सखाराम सावळ, विभागीय कार्यशाळा प्रतिनिधी सुयोग तांबे,कणकवली आगार संकेत फोंडेकर , कणकवली आगार सदस्य विराज पोईपकर, सावंतवाडी आगार सदस्य मुक्तूम शेख,अमोल कदम,कुडाळ आगार विनोद चव्हाण,कणकवली आगार कार्याध्यक्ष उमेश बोभाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित सर्वानी एस टी महामंडळाचे पहिले वाहक लक्षुमणराव केवटे यांचे १०० व्या वर्षी निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी संघटनेचा उपयोग कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी करता येणार नाही असे सांगत कर्मचाऱ्यांना जर कोणी त्रास देत असेल तर त्याला योग्य ते उत्तर देण्यात येईल असेही ते म्हणाले. संघटनेचे उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी संघटनेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सहकार्य करून आपल्या संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात प्रवाशांचे एकही तक्रार येता कामा नये अशी सूचना देत अधिकाऱ्यांनी किंवा वरिष्ठांनी अन्याय केल्यास त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होता नाही असे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघटनेच्या पहिल्या कार्यकारी बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली उपस्थित झालेल्या प्रश्नांची वर्गीकरण राज्यस्तर, विभाग सर, आगार स्तर असे करण्यात आले व त्याप्रमाणे त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्नाविषयी पत्रव्यवहार करण्याचे ठरले तसेच लवकरच संघटनेचे नेते व अध्यक्ष गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे ठरवण्यात आले.