उद्योगमंत्र्यांच्या हस्ते झालेला सत्कार संस्मरणात राहील

उद्योगमंत्र्यांच्या हस्ते झालेला सत्कार संस्मरणात राहील

*कोकण Express*

*उद्योगमंत्र्यांच्या हस्ते झालेला सत्कार संस्मरणात राहील*

*विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब यांचे भावोद्गार…*

*रत्नागिरी:-*

आपल्या कोकणातील सुपुत्र आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत एकत्र व एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून बोलण्याची आज जी संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.महाराष्ट्र राज्याचे मंत्रीमंडळात उद्योग खाते हे अतिशय चांगल्या पद्धतीने चालवून उदय सामंत यांनी कोकणातील आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे.आज माझा जो उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार झालाय तो मी नेहमीच जीवनात स्मरणात ठेवीण.त्यामुळे मी सर्वाना धन्यवाद देत असे भावनिक उद्गार विशाल सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी काढले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पेवे खरेकोंड ता.गुहागर येथील हनुमान मंदिराच्या जिर्णोद्धार व उद्घाटन समारंभाच्या पूर्व संध्येला व्यासपीठावर विशाल परब बोलत होते.यावेळी व्यासपीठावर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत,विशाल सेवा फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व भाजपचे युवा नेते विशाल परब,माजी आमदार विनय नातू,मुंबई उच्च न्यायालयाचे वकील सुरेश सबरद,अमित लोटणीकर,दत्ता नरवणकर यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उद्योजक विशाल परब यांचा भव्य दिव्य सत्कार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उदय सामंत यांनी आपल्या भाषणात धमाल परब यांचे कौतुक करत गौरवोद्गार काढले.तर विशाल परब यांना भावि वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!