*कोकण Express*
*फोंडा बाजारपेठेतील शंकर दत्तात्रय तावडे यांचे दुःखद निधन.*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट बाजारपेठेतील जुने – जाणते पानपट्टी व्यापारी आणि “बचपन के दोस्त” ग्रुपचे सदस्य शंकर तावडे ( ६९ वर्ष ) यांचे प्रदीर्घ आजाराने आज सकाळी दुःखद निधन झाले. स्मितभाषी-आनंदी स्वभावामुळे त्यांची बाजारपेठेत ओळख होती. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा भाऊ असा परिवार आहे. फोंडा रिक्षा युनियनचे अध्यक्ष हेमंत तावडे यांचे ते बंधू होत.. अंत्ययात्रेत सर्व स्तरातील लोकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली..