*कोकण Express*
*कणकवली काँग्रेस कार्यालयात स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी……*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारताचे माजी पंतप्रधान संगणक व डिजिटल क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी आज कणकवली काँग्रेस कार्यालयात साजरी करण्यात आली .
तपस्या आणि त्याग ….
आधुनिक विचार आणि उत्तुंग झेप घेत भारताला खऱ्या अर्थाने २१ व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा हब बनविणारे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान श्री. राजीव गांधीजींचा आज स्मृतीदिन…
आज कॉम्प्युटर, नेट, सॉफ्टवेअर असो अथवा १८ वर्षांवरील तरुणांना देशाच्या भविष्यात भाग घेणारे मतदान असो त्यांच्या प्रत्येक निर्णयात भविष्यातील भारत घडत गेला…
यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर ,जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंभबुलकर, जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरुणकर, तालुका सरचिटणीस महेश तेली, तालुका युवक अध्यक्ष अनिकेत दहिबावकर, प्रदीप कुमार जाधव, राजू वर्णे, कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.