*कोकण Express*
*गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखली…*
*राज्य उत्पादन शुल्क खात्याची कारवाई; ७० लाख ८ हजारचा मुद्देमाल जप्त*
*बांदा ः प्रतिनिधी*
गोव्याहून मुंबईच्या दिशेने ट्रक मधून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने कारवाई करत ५८ लाख ८ हजार रुपये किमतीच्या दारुसाह एकूण ७० लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली. काळोखाचा फायदा घेत चालकाने पलायन केले. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली.
सिंधुदुर्ग अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 1100 कागदी पुठ्याचे बॉक्स आढळले. गाडीमध्ये मिळालेल्या कागदपत्रामधील तपशीलानुसार वाहन मालक विनोद पहानाथ राव, रा. पनवेल, जि. रायगड व फरार संशयीत अज्ञात वाहन चालक यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका इन्सुली संजय मोहिते, भरारी पथक निरीक्षक, श्री. संजय दळवी, दुय्यम निरीक्षक श्री. प्रदीप रास्कर, श्री. तानाजी पाटील, श्री. दिवाकर वायदंडे, श्री जमनाजी मानमोड, स. दु. निरी श्री. गोपाळ राणे, श्री. सुरज चौधरी, श्री रमाकांत ठाकुर तसेच जवान श्री. रणजीत शिंदे, श्री. संदीप कदम, श्री. देवेंद्र पाटील यांनी भाग घेतला. सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, सीमा तपासणी नाका, इन्सुली श्री. प्रदीप रास्कर हे करीत आहेत.