*कोकण Express*
*पंजाब राज्यामधील होणाऱ्या युवा संगम मध्ये सिंधुदुर्ग चा ऐश्वर्य मांजरेकर करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व*
एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत भारतातील 23 राज्य ते भारतातील इतर राज्यातील युवकांचा युवा संगम होत आहे. सिंधुदुर्ग मधील ऐश्वर्य मांजरेकर करणार राज्यातील 35 युवकांसह महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व
सिंधुदुर्ग :- भारत सरकारच्या गृहमंत्रालय, सूचना एव प्रसारण मंत्रालय , शिक्षा मंत्रालय , संस्कृती मंत्रालय, युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय , पर्यटन मंत्रालय , माहिती प्रसारण मंत्रालय , ए आय सी टी , भारतीय रेल्वे मंत्रालय , आय आर सी टी सी, व पूर्वोत्तर व्यवहार मंत्रालय व देशभरातील नामांकित आय. आय. टी , एन. आय. टी , डॉ . बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी, एम. एन . एन. आय टी, एम . एन . आय . टी, एन. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ युवा संगम ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, हा कार्यक्रम 13 मे ते 19 मे दरम्यान पंजाब मध्ये होणार आहे.
या कार्यक्रमात तरुणांना एकमेकांच्या परंपरा , संस्कृती , निसर्ग , चालीरीती कळतील . यामुळे तरुणांना एकमेकांची संस्कृती आणि परंपरा समजून घेण्याची संधी मिळेल. एक भारत श्रेष्ठ भारताची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये सरदार वल्लभाई पटेल यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त केली होती. भारताची एकता, शांतता आणि सौहार्दासाठी जगभरात ओळख आहे. त्यामुळे हा उपक्रम लोकांना एकमेकांशी जोडून देशभर एकता, शांतता आणि सद्भावना वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग चे मालवण तालुका समन्वयक व व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळ चे विद्यार्थी ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांची निवड महाराष्ट्रातून युवा प्रतिनिधी म्हणून करण्यात आली आहे. ऐश्वर्य मांजरेकर नेहरु युवा केंद्र व इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक , कला , क्रीडा, सार्वजनिक स्वछता , आरोग्य आदी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. पंजाब मध्ये होणाऱ्या युवा संगम साठी येणारे युवक हे १८ -३० वर्ष गटातील आहे या युवा संगम दरम्यान युवकांना देशातील पाच व्यापक क्षेत्र पर्यटन , परंपरा , प्रगती, प्रद्योगिक आणि परस्पर संपर्क याबद्दल बहुआयामी अनुभव मिळेल. महाराष्ट्रातून 35 युवक व दादरा – नगर हवेली, दमण- दीव या केंद्रशासित प्रदेशातील 10 विद्यार्थ्यांची निवड झाली असून ते महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. महाराष्ट्रातील युवकांचा युवा संगम आय आय टी मुंबई व एन आय टी जालंधर करणार आहे. युवा संगम मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झाल्याबद्दल नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा युवा अधिकारी मोहीत कुमार सैनी व व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळ चे प्रिन्सिपल शिल्पा मर्गज व समस्त सिंधुदुर्गवासियांनी यांनी त्यांचे अभिनंदन केले.