*कोकण Express*
*तळेरेतील दत्त मंदिरचा आजपासून जिर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठापना सोहळा*
*विविध धार्मिक कार्यक्रम 13 ते 15 मे पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तळेरे औन्दुबरनगर येथील श्री दत्त मंदिरचा जिर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित केला असून यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला आजपासून (ता. 13) सुरुवात होणार असून सोमवारी (ता. 15) प. पू. श्री. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे.
शनिवार, दि. 13 मे रोजी दु. 3 वा. श्री. दत्तमूर्तीची श्री गांगेश्वर मंदिर ते श्री दत्त मंदिर अशी भव्य ढोल ताशांच्या गजरात पारन्पारिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी सुंदर चित्ररथ व शिडवणे (कोणेवाडी) येथील श्री. गांगेश्वर ढोल पथक याचे ढोल वादन व शिडवणे येथील माऊली प्रासादिक वारकरी दिंडी भजन मंडळ यांचे विशेष आकर्षण असणार आहे.