*कोकण Express*
*मळेवाड पर्यटन महोत्सव 2023 चा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सांगता समारंभ संपन्न*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मळेवाड येथील पर्यटन महोत्सव 2023 चा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सांगता समारंभ पार पडला.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे यांच्यावतीने पाच दिवसीय भव्य युवा सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाचा सांगता समारंभ भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते समारंभ पार पडला.यावेळी मळेवाड येथील ज्येष्ठ नागरिक श्रीधर नाईक यांच्या हस्ते निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना निलेश राणे यांनी सहा वर्ष सातत्य ठेवून महोत्सव करत असल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.गावाच्या विकासासाठी लागणारा निधी देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू असे आश्वासित केले.भाजप आणि शिंदे यांचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यात विकास निधीमोठ्या प्रमाणात येत असून मळेवाड कोंडूरे गावाच्या विकासासाठी ही निधी देण्याचे आश्वासनही दिले.या महोत्सवाला सहा वर्ष पूर्ण झाली असून महोत्सव आयोजनाचा शतक महोत्सव व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.तसेच जिल्हा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी महोत्सवाला शुभेच्छा देत गाव पातळीवर असे महोत्सव आयोजित करणे फार कठीण असून त्यात सातत्य ठेवणे फार कठीण असते.मात्र हे सातत्य ठेवण्यात ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ यशस्वी ठरले आहे असे मत व्यक्त केले.भाजप जिल्हा सचिव राजन तेली यांनी आपले मत व्यक्त करत असताना विकास निधी मिळवण्यासाठी सातत्य रागाणं गरजेचे असून ती सातत्य मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायत राखत आहे.या गावाला भरघोस निधी मिळावा यासाठी उपसरपंच हेमंत मराठे वारंवार पाठपुरावा करत असून आतापर्यंत लाखो रुपयांचा निधी मराठे यांनी भाजपच्या माध्यमातून या गावाला मंजूर करून घेतला आहे.भविष्यातही या गावाच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी हेमंत मराठे यांची मागणी असून हेमंत मराठे यांच्या मागणीनुसार भाजपच्या माध्यमातून या गावाला भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तेली यांनी दिले.ज्या जागेवर महोत्सव होतोय त्या ठिकाणीबाल उद्यान उभारण्याचा उपसरपंच हेमंत मराठे यांचा मानस असून त्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत आवश्यक निधी देण्याचे आश्वासनही तेली यांनी दिले.
मान्यवरांच्या हस्ते गावातील विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.तसेच कु. आर्या मिलिंद मुळीक हिने लिहिलेल्या कवितांचा ‘सप्तरंग’ हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.कोकण मराठी साहित्य परिषद व ग्रामपंचायत असे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आर्या मुळीक हिने आपला हस्तलिखित कवितासंग्रह सादर केला होता.यावेळी आर्या हिला स्फूर्ती मिळावी यासाठी ग्रामपंचायत कडून तुझा कविता संग्रह प्रकाशित करण्याचा शब्द सरपंच सौ मिलन विनायक पार्सेकर व उपसरपंच हेमंत रमाकांत मराठे यांनी आर्या दिला होता.त्यानुसार या पर्यटन महोत्सवामध्ये तिचा कवितासंग्रह प्रकाशित करून ग्रामपंचायत कडून दिलेला शब्द पूर्ण करण्यात आला असून त्यांचे समाधान वाटत आहे असे मत उपसरपंच हेमंत मराठे यांनी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर उद्योजक दत्ता गोठणकरउद्योजक सुरेश बोवलेकर,प्राध्यापक राजाराम परब,रुपेश पाटील सर,भाजप शक्ती केंद्र प्रमुख लाडोबा केरकर,ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,मधुकर जाधव,खुशी कुंभार,सौ कविता शेगडे,सौ सानिका शेवडे,अर्जुन मुळीक,भिवसेन मुळीक,शुभम धुरी आदी उपस्थित होते.
फोटो ओळ – भव्ययुवा सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 च्या संगत सांगता समारंभ वेळी निलेश राणे, सोबत राजन तेली,संजू परब,सरपंच मिलन पार्सेकर व इतर मान्यवर.