*कोकण Express*
*भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे.
यापूर्वी सिंधुदुर्ग भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे अतुल काळसेकर यांनी सांभाळली होती. त्यानंतर लोकसभा प्रवास
योजनेच्या प्रमुख पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा राज्य भाजपाची उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे
जबाबदारी सोपवल्याने पुन्हा एकदा सिधुदुर्ग जिल्ह्यातील एका निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान या निमित्ताने झाला आहे. श्री. काळसेकर
यांच्यासोबत माधव भंडारी यांची देखील या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपत्रांच्या निवडीबद्दल सर्व
स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.