*कोकण Express*
*सिंधुदुर्ग स्थापना दीनानीमित्त मनसे तर्फे सोलर स्ट्रीट लाईट लोकार्पण*
सिंधुदुर्ग स्थापना दिनाच्या औचित्य निमित्ताने कणकवली तालुक्यातील कसवण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली, मनसेचे गणेश कदम व सुनील सोनार यांच्या सौजन्याने शिवजयंती उत्सव मंडळ गावकर वाडी, लिंग रवळनाथ मंदिर कमानी , ख्रिश्चन स्मशानभूमी येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार सोलर लाईट लोकार्पण करण्यात आले. या सोलर स्ट्रीट लाईट मुळे कसवण ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी फिरताना सोयीचे होणार आहे त्यामुळे या मनसेच्या लोकऊपयोगी उपक्रमामुळे ग्रामस्थांनी गणेश कदम व सुनील सोनार यांचे आभार मानले.