सुजित जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार

*कोकण Express*

*सुजित जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या मार्फत प्रति वर्षी समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार दिला जातो. सण २०२० चा हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांना प्रदान करण्यात आला.
गेली अनेक वर्षे सुजित जाधव हे राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. समाजात वावरत असताना सामान्यांच्या हक्कासाठी झटणाऱ्या सुजित जाधव यांचा सन्मान लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते म्हणून सन्मान करण्यात आला. शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देत उपसरपंच अरुण राऊळ, यांच्या शुभहस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, उद्योजक संदीप चौकेकर, सरपंच दीपक गुरव, लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे
मंडळाचे अध्यक्ष लवू परब, संस्थापक रवींद्र परब, माजी अध्यक्ष सुभाष परब, उपाध्यक्ष भरत गावडे, दीपक राऊळ, खजिनदार गणेश गावडे, सचिव दिपेश परब, सहखजिनदार अक्षय परब, मंगेश गावडे, वामन परब, दीपक लाड, सचिन परब, उमेश परब, विकास गावडे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!