*कोकण Express*
*दैनिक तरुण भारतचे पत्रकार राजेश मोंडकर यांना कै.माजी आमदार जयानंद मठकर स्मृती पुरस्कार जाहीर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दैनिक तरुण भारतचे राजेश मोंडकर,दैनिक सकाळचे पत्रकार भुषण आरोसकर,दैनिक प्रहारचे पत्रकार व फोटोग्राफर जतीन भिसे, जेष्ठ पत्रकार तथा स्वातंत्र्य सेनानी वसंत उर्फ अण्णा केसरकर व मोहन जाधव यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत
सावंतवाडी येथील पत्रकार संघाच्यावतीने दिले जाणारे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यात माजी आमदार जयानंद मठकर स्मृती पुरस्कार राजेश मोंडकर यांना,मे.द.शिरोडकर पुरस्कार भुषण आरोसकर यांना,डॉ.अजय स्वार यांच्याकडून दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव तर कै. बाप्पा धारणकर यांच्या नावे दिला जाणारा उत्कृष्ट अष्टपैलू पुरस्कार छायाचित्रकार जतिन भिसे व चंदू उर्फ हरिश्चंद्र वाडीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जेष्ठ पत्रकार तथा स्वातंत्र्य सेनानी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
पत्रकार संघाच्यावतीने सुचविण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले यावेळी नगरसेवक तथा जेष्ठ वकील परिमल नाईक,सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अभिजीत चितारी,पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय देसाई,सचिव अमोल टेंबकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर आदींनी ही निवड केली या पुरस्कारांचे वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
