*कोकण Express*
*कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे १५ व १६ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन.!*
*सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचा उपक्रम*
*कासार्डे ; संजय भोसले*
शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि वैभववाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे 15 व 16 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे सदार पंच शिबीर हे सिंधुदूर्ग कब्बडी फेडरेशन च्या मान्यतेने घेण्यात येत आहे. इच्छुकांनी कबड्डी पंच परीक्षेसाठी नाव नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे. पंच परीक्षेला सहभागी होत असताना संबंधितांनी सोबत कंपास पेटी व मूळ फॉर्म भरून घेऊन येणे यावे तसेच पासपोर्ट साईज ४ रंगीत फोटो, वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला अथवा शाळा सोडलेल्या दाखल्याची झेरॉक्स प्रत घेऊन यावी.