*कोकण Express*
*मराठा आरक्षण,शेतकऱ्यांच्या प्रश्नात शिवसेना दिसली नाही…*
*नितेश राणेंची टीका; आपली उणी धुणी बाहेर येत असल्यानेच ईडीच्या विरोधात आंदोलन…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना नेत्यांची उणी धुणी काढली जात असल्यामुळे त्यांनी ईडीच्या विरोधात मोर्चाचा इशारा दिला आहे.आता मोर्चाचा इशारा देणारे शिवसेनेचे नेते मराठा आरक्षण,शेतकऱ्यांची कर्ज माफी आणि केंद्र शासनाकडून मदत यासाठी केलेल्या आंदोलनात दिसले नाहीत,अशी टीका भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
यात म्हटले आहे की, ईडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.त्यामुळे आपली उणी धुणी बाहेर पडू नयेत,म्हणून त्यांनी मोर्चाचा इशारा दिला आहे .परंतु लोकांच्या प्रश्नाच्या वेळी शिवसेनेने मोर्चा काढला नाही,असेही त्यांनी म्हटले आहे.