सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री प्रकाश कांबळे आणि पदाधिकारी यांचा सिंधुदुर्ग दौरा

सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री प्रकाश कांबळे आणि पदाधिकारी यांचा सिंधुदुर्ग दौरा

*कोकण Express*

*सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री प्रकाश कांबळे आणि पदाधिकारी यांचा सिंधुदुर्ग दौरा*

*सिंधुदुर्गामध्ये एस्.टी.कर्मचाऱ्यांची ” सेवाशक्ती संघर्ष एस्.टी. कर्मचारी संघ ” युनियनची स्थापना …..*

*वेंगुर्ले आगार अध्यक्षपदी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड*

सिंधुदुर्ग विभागातील सेवा शक्ती संघर्ष चे मुख्य शिलेदार श्री *प्रशांत गावडे आणि उभरते कर्मचारी नेतृत्व श्री रोशन तेंडुलकर, वेंगुर्ला अगाराचे श्री भरत चव्हाण* यांच्या समवेत केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग दौरा करून विजयदुर्ग,देवगड,मालवण वेंगुर्ला,सावंतवाडी,कणकवली या विभागातील डेपोंना भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या, कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, त्यामध्ये वेंगुर्ला आगाराने तात्काळ कार्यकारणी करून घेतली, आनंदाची गोष्ट मध्ये म्हणजे *भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई यांनी अध्यक्षपद स्वीकारले* , तात्काळ अगारव्यवस्थापकांना कार्यकारणी देण्यात आली आणि तेथील बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाबद्दल चर्चा करुन ते सोडवण्यासाठी ठराविक दिवसाचा कालावधी देण्यात आला .
सावंतवाडी आगारातील सेवाशक्तीचे प्रशांत माडकर यांना घेऊन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबद्दल इन्चार्ज समवेत चर्चा करण्यात आली, दौऱ्या दरम्यान श्री रोशन तेंडुलकर यांच्या कामाची धमक, त्यांच्या प्रती कामगारांमध्ये असलेला विश्वास पाहायला मिळाला .
दौऱ्या दरम्यान *आदरणीय आमदार नितेश राणे साहेब यांचीही केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली*, माननीय राणेसाहेबांनी सेवाशक्ती संघर्षला सर्व प्रकारची मदत करू,कर्मचाऱ्यांचा कुठलाही प्रश्न तात्काळ विभागातील अधिकाऱ्यांना बोलून सोडवु असे सांगितले .
लवकरच सिंधुदुर्ग विभागामध्ये विभागीय आणि डेपोच्या कार्य कारण्या होतील,
वेंगुर्ला, कणकवली आणि शक्य तिथे आम. नितेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते बोर्ड अनावरण होईल.
दौऱ्यामध्ये श्री *प्रकाश कांबळे समवेत श्री बापू हराळे , श्री विठ्ठल मंठाळकर , श्री रामचंद्र मुंडे , श्री बालाजी गोणे हे केंद्रीय पदाधिकारी राहिले*, अशा प्रकारे श्री प्रशांत गावडे, सेवाशक्तीचे कोकणाचे नेतृत्व रोशन तेंडुलकर, श्री भरत चव्हाण यांच्या सहकार्याने आणि आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या ऊर्जेतून, वेंगुर्ला आगाराची धडाडी या सर्वामुळे हा दौरा अत्यंत यशस्वी पार पडला, असेच महाराष्ट्रातील इतर विभागातही सेवाशक्तीला कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळेल आणि कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी सेवाशक्ती संघर्ष टीम माननीय आम.गोपीचंद पडळकर साहेब , आम. सदाभाऊ खोत, सतीश दादा मेटकरी यांच्या नेतृत्वात लढतच राहील.
यावेळी सेवा शक्ती संघर्ष एस्.टी.कर्मचारी संघाच्या *वेंगुर्ले आगार* *उपाध्यक्ष* पदी सखाराम बा.सावळ , *कार्याध्यक्ष* पदी आशिष वराडकर , *सचिव* पदी दाजी वि.तळवणेकर , *सह सचिव* पदी मिलिंद श.मयेकर , *खजिनदार* पदी संजय दे.झोरे , *सह खजिनदार* विनायक द.दाभोलकर , *प्रसिद्धी प्रमुख* पदी निखिल ए.भाटकर , *सल्लागार* पदी मनोहर ग.वालावलकर , *सदस्य* पदी सचिन स.सावंत व आशिष बा.धावडे इत्यादी कार्यकारणी निवडण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!