काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्याबद्दल जोरदार निदर्शने

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्याबद्दल जोरदार निदर्शने

*कोकण Express*

*काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्याबद्दल जोरदार निदर्शने*

*कणकवली ः प्रतिनिधी*

काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने दोन वर्ष तुरुंंवावासाची शिक्षा सुनावली आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत निरव मोदी, ललीत मोदी सारखे सगळेच मोदी चोर कसे? या विधानावर कोर्ट एवढी शिक्षा कशी काय करु शकते ?याचा अर्थ मोदी देशात हिटलर शाही आणु पहात आहे. राहुल जींची भारतजोडो यात्रेनंतर वाढलेली लोकप्रियता तसेच अडाणी प्रकरणात संसदेत जेपीसी चौकशीची केलेली मागणी ,यामुळे मोदी व भाजप कुठेतरी अडचणीत येणार आहे. त्यामुळे दोन वर्षाची शिक्षा करुन त्यांच संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याचा आणी विरोधी आवाज बंद करण्याचा हा डाव आहे,अशी टीका काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी केली.कणकवलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्याबद्दल जोरदार निदर्शने करण्यात आली.

या विरोधात काॅग्रेस या सर्वाला पुरुन उरेल व भाजप व मोदींचा हिटलर वादी बुरखा फाडेल. या साठी कणकवली तालुका काँग्रेस तर्फे तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्रसरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर,जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरये, अनिल डेगवेकर, प्रविण वरुणकर,अजय मोरये ,संतोष टक्के,प्रदीपकुमार जाधव, अनिकेत दहीबावकर, महादेव दहीबावकर, अमित मांडवकर, रुपेश साळुंखे, देवेंद्र दहीबावकर ,साईनाथ दहीबावकर, गजानन मोरये ,निलेश दहीबावकर ,संदीप कदम ,पंढरीनाथ पांगम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!