*कोकण Express*
*माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू ४ जानेवारीला करणार चिंचवली रेल्वे स्टेशनची पाहणी…*
भाजपा नेते, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू सोमवार . ४ ला दुपारी १ वाजता नव्याने उभारण्यात आलेल्या खारेपाटण रोड-चिंचवली रेल्वे स्टेशनला भेट देणार आहेत. यावेळी ते स्टेशन परिसरची पहाणी करणार आहेत. या दौऱ्याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा आमदार नितेश राणे, माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष नासीर काझी तसेच संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी विभागातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी वेळीच चिंचवली रेल्वेस्टेशन येथे उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा खारेपाटण शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी केले आहे.