नगरपंचायत च्या माध्यमातून कणकवलीत विकास कामांचा धडाका सुरूच | मराठा मंडळकडे जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ

नगरपंचायत च्या माध्यमातून कणकवलीत विकास कामांचा धडाका सुरूच | मराठा मंडळकडे जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ

*कोकण Express*

*नगरपंचायत च्या माध्यमातून कणकवलीत विकास कामांचा धडाका सुरूच | मराठा मंडळकडे जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शहरातील कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंजूर झाली असून, यातीलच एक मंजुरी असलेला कणकवली महामार्ग ते नेहरूनगर मराठा मंडळ पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक पांडुरंग परब यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली शहरातील अनेक रस्त्यांची डांबरीकरणं करण्याच्या कामांना मंजुरी मिळाली असून, काही कामे पूर्ण झाली तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांनी या कामांकरिता निधी आणला असून, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. नेहरूनगर मधील या कामाबद्दल नेहरूनगर वासियांमधून देखील यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले.

Development works continue in Kankavli through Nagar Panchayat Inauguration of road leading to Maratha Mandal

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, संजय मालांडकर, राजन परब, संजय ठाकूर, मनोज हिर्लेकर, कल्याण पारकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!