*कोकण Express*
*पणदुर येथे विकासकामांच्या भूमिपुजनास सुरुवात*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
आता केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असून यामुळे विकासकामांना गती मिळेल. भविष्यात पणदूर परिसरातील अनेक कामे भाजपच्या माध्यमातून केली जातील असे आश्वासन भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी दिले पणदूर गावासह तालुक्यात निलेश राणे यांच्याकडून कोट्यवधी विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका लावण्यात आला…
भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ तालुक्यात विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. याची सुरुवात पणदूर येथील विकासकामांच्या भूमिपूजनाने सुरवात झाली. यामध्ये जल जीवन मिशन, डोंगरी विकास कार्यक्रम, 2515 कार्यक्रम, जिल्हा वार्षिक कार्यक्रम यामधून मंजूर सुमारे 1 कोटी रकमेच्या विविध विकासकामांचा समावेश आहे..
यावेळी पणदूर गावचे माजी सरपंच तथा भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, श्रीपाद तवटे, डॉ. अरुण गोडकर, जगदीश उगवेकर, बूथ कमिटी अध्यक्ष दीपक साईल, बबन राऊळ, ग्राप सदस्य अपर्णा साईल, भगवान साईल, अरविंद साईल, विनायक साईल, बबन निर्गुण, उदय गोसावी, प्रकाश गोसावी, मोहन मयेकर, दशरथ मयेकर, दाजी गोसावी, गणेश साईल, आना गोसावी, अवधूत सामंत, योगेश घाडी, मनोरंजन सावंत, अनंतराज पाटकर, अमित तावडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी पणदूर गावच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे सांगत येथील अजून काही अपूर्ण असतील तर आपण यासाठी आवश्यक तो निधी देवू, असे आश्वासन दिले. मागील ८ महिन्यात सिंधुदुर्गात विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत असून त्यापूर्वी सात वर्षे हा जिल्हा विकास पासून वंचित राहिला. केवळ मागच्या अडीच वर्षात राजकीय हेवेदावे दिसून आले. आता केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असून यामुळे विकासकामांना गती मिळेल.
मागे पणदूर गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दादा साईल यांचा पराभव झाला तरी खचून न जाता दादा यांनी गावात विकासकामे मंजूर करून घेतली, असे गौरोद्गार काढले. यावेळी पणदूर बूथ कमिटी अध्यक्ष दीपक साईल यांनी भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी पणदूर गावच्या विकासात निलेश राणे यांचा मोठा हातभार असून त्यांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात निधी या गावासाठी उपलब्ध करून दिला आहे, असे दादा साईल यांनी सांगितले. येत्या काळात कुडाळ-मालवण मतदारसंघातून भाजप नेते निलेश राणे यांना आमदार व्हावेत अशी सर्व पणदूर वासीयांची इच्छा असल्याचे दादा साईल यांनी यावेळी म्हटले.
पणदूर गावातील उर्वरित विकासकामे लवकरच पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली तसेच भाजप नेते यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.