*कोकण Express*
*शिवसेना नुतन जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांचा कणकवली तालुक्याच्या वतीने सत्कार*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुक्याच्या वतीने नुतन शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख श्री.सतिश सावंत यांचा सत्कार शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे करण्यात आला. यावेळी “शिवसेना जिंदाबाद”, उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है”, “सतिश सावंत आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला तालुका संघटक वैदेही गुडेकर, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, नगरसेवक कन्हैय्या पारकर, हर्षद गावडे, राजु राठोड, ललित घाडीगावकर, गोट्या कोळसुलकर, अनुप वारंग, विलास गुडेकर, महेश कोदे, एकनाथ कोकाटे, सुनिल कुलकर्णी, बापु नर, संतोष सोरप, जगू आजगावकर, चंदु परब, संतोष परब, वेंकटेश वारंग, बंड्या नाईक, दिव्या साळगावकर, माधवी दळवी, संजना कोलते, सुप्रिया खडपे, सचिन राणे, दादा भोगले, बेनी डिसोझा, मंगेश सावंत, राजु पाटील, योगेश वाळके, संदीप गावकर, संतोष सावंत, गुरु सावंत आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.