सावंतवाडी पालिकेच्या समोर वाहतूक पोलिसांसाठी “मिनी चौकी” उभारणार.

सावंतवाडी पालिकेच्या समोर वाहतूक पोलिसांसाठी “मिनी चौकी” उभारणार.

*कोकण Express*

*सावंतवाडी पालिकेच्या समोर वाहतूक पोलिसांसाठी “मिनी चौकी” उभारणार…*

*रफिक शेख यांचा निर्णय; निलेश राणेंच्या वाढदिवसा दिवशी उद्घाटन…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

भाजपाचे युवा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी पालिका कार्यालयासमोर मिनी पोलिस चौकी उभारण्याबरोबर त्याठिकाणी पाणपोईची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांनी दिली आहे. त्याठिकाणी ड्युटी बजावत असलेले पोलिस उन्हातान्हात उभे राहत असतात. त्यामुळे आपण हा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याहस्ते श्री. राणे यांच्या वाढदिवसा दिवशी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. श्री. शेख यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, सावंतवाडी मोती तलावाच्या समोर ड्यूटी बजावत असलेले वाहतूक पोलिसांना उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात अनेक समस्यांना ताेंंड द्यावे लागते. एका संस्थेकडुन त्याठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. परंतु तो तंबू अज्ञाताकडुन काढून टाकण्यात आला. त्यामुळे तुर्तास पोलिसांना झाडाखाली किंवा उन्हातच उभे रहावे लागत आहे. त्यांचे हे हाल लक्षात घेता श्री. राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याठिकाणी कायमस्वरुपी मिनी पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी पाण्याची सोय करण्यात येणार आहे. जेणे करुन त्याठिकाणी येणार्‍या-जाणार्‍या तसेच आठवडा बाजारात येणार्‍या लोकांना सुध्दा त्यांचा फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!