*कोकण Express*
*जिल्हास्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने अश्विनी जाधव सन्मानित*
*राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय *सह्याद्री भूषण* सोहळा २०२३ संपन्न*
*कणकवली/प्रतिनीधी*
सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र व सह्याद्री सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यात गडहीग्लज तालुक्यामध्ये गडहिंग्लज नगर परिषद गडहिंग्लज येथे सह्याद्री भूषण राज्यस्तरीय सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हास्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने अश्विनी जाधव यांना गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्य संपादक व संस्थापक सह्याद्री सोशल फाउंडेशन महाराष्ट्र नितीन बोटे, संपादक संभाजी जाधव,कार्यकारी संपादक धनाजी देसाई , कोकण विभाग प्रमुख विनोद जाधव, कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव , यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमास राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाश आबिटकर,जी प सदस्य जिवमदादा पाटील, गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, नियोजन मंडळाचे सदस्य अशोकअण्णा चराठी , मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष पुंडलिक जाधव,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित हा सोहळा पार पडला.
यावेळी आम.आबिटकर अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले, सह्याद्री लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी होणारा हा पुरस्कार वितरण सोहळा समाजाला उमेद देणार आहे. आज या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. आपल्या सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा व सह्याद्री लाईव्ह या सर्वप्रथम असेच कार्यक्रम घेऊन समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या लोकांचे कौतुक करण्यासाठी भविष्यकाळात चांगले यश मिळावं असे श्री.आम. आबिटकर म्हणाले.
यावेळी पुंडलिकभाऊ जाधव म्हणाले, समाजातील काही अशा घटकांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित केला. त्यांचे काम इतके महान असून त्यांच्या कार्याचा गौरव फारसा कमीच होतो असे काही यातील पुरस्कर्ते आहेत त्यांना आपण सन्मानित केला. सह्याद्री लाईव्ह युट्युब वर पोर्टल चैनल या माध्यमातून हा पुरस्कार सालाबाद प्रमाणे होत आहे. यामध्ये शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा संस्कृती गडकोट अशी काही आपण विविध पुरस्कर्ते जे निवडले आहात त्यांचे काम पाहिले असता उल्लेखनीय कार्य आहे अशा घटकांचा आम्ही आदर करतो यासाठी असेच आपण नेहमी कार्यक्रम घेऊन आपले चॅनेल महाराष्ट्रात नाहीतर देशात पोहोचावे यासाठी आमच्याकडून शुभेच्छा असे श्री. जाधव म्हणाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
जी प सदस्य जिवमदादा पाटील, गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, नियोजन मंडळाचे सदस्य अशोकअण्णा चराठी , मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले आदी प्रमुख मान्यवरांचा उपस्थित हा सोहळा पार पडला.
यावेळी सर्वांनी सह्याद्री सोशल फाउंडेशन व सह्याद्री लाईव्ह चैनल महाराष्ट्रचे भरभरून कौतुक केले. असंच आपलं प्रेम सह्याद्री लाईव्ह चैनल वर महाराष्ट्रातील जनतेने पोहचावे व हीच आमची मनःपूर्वक अपेक्षा.
सूत्रसंचालन दयानंद भंडारी व इंद्रायणी सुतार यांनी केले.पुरस्कार पुरस्कर्त्यांना मानपत्र, शिल्ड, शाल, पुष्पगुच्छ मान्यवरांच्या उपस्थित देऊन गौरवण्यात आले. सहयाद्री लाईव्ह महाराष्ट्र यांच्या वतीने सर्व पुरष्कार विजेत्यांचे अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.